"घार्गेंचा पक्ष कोणता ते आजही सांगू शकत नाहीत. पवारांवर निष्टा असल्याचे सांगणारे घार्गे लोकसभेवेळी भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रीय समाज पक्षाकडे तिकीट मागायला हात पसरत गेले होते."
बिजवडी : परवा खटाव तालुक्यातील बाजारात आलेल्या कोल्ह्याला मी मतदारसंघात पाणी आणल्याचे माहीत नाही. त्याने आणि घार्गेंच्या मुळावर उठलेल्या त्याच्याबरोबरच्या टोळक्याने शंभूखेडमध्ये यावे. त्यांना जिहे- कठापूर योजनेच्या पाण्यात बुडवून काढतो. बापाच्या जिवावर कॉन्ट्रॅक्टर झालेल्या नारळफोड्याने त्याच्या आवाक्याबाहेरचा बोराटवाडीचा विषयच घेऊ नये. मी मायणीत येतो तेव्हा माझ्यासमोर उभे राहून दाखवावं, असे आव्हान आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सुरेंद्र गुदगे आणि ठरलंयवाल्या टीमला दिले.