‘‘जयकुमारला पाडायचे सोपे नाही. ते काम फक्त शेखर तुम्हीच करू शकता, असे शरद पवार म्हणाले होते.''
बिजवडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अनेकदा विश्वासघात होऊन देखील आपण शरद पवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून लोकसभेला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी स्वखर्चातून रात्रीचा दिवस केला. त्यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला विधानसभा निवडणुकीत आघाडीची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, आता हा शब्द बदलला आहे. त्यामुळे आपण शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत असून, कार्यकर्त्यांसमवेत दोन दिवसांत आपण वेगळा निर्णय घेणार असल्याचा इशारा शेखर गोरे यांनी दिला आहे.