''उमेदवारीसाठी सगळ्यांनी ठरवून प्रभाकर देशमुखांचे लोणचे केले. त्यांना विरोध करून घार्गेंनी उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे.''
बिजवडी : माण-खटाव विधानसभा निवडणुकीचे (Man-Khatav Assembly Elections) तिकीट ठरवण्यासाठी आघाडीचे ठरलयवाले दोन महिने फलटण आणि बारामतीकरांचे तळवे चाटत होते. त्या प्रभाकर देशमुखांचे लोणचे करून ज्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली आहे, त्या प्रभाकर घार्गेंची (Prabhakar Gharge) अस्मिता डॉ. दिलीप येळगावकर आणि रणजित देशमुखांनी निवडणूक लढविली होती, तेव्हा कुठे गेली होती. अस्मितेच्या बाता मारून माण आणि खटावमध्ये भांडणे लावण्याचे घार्गेंचे मनसुबे सुज्ञ जनता निश्चित उधळून लावणार असल्याचा विश्वास आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.