Maharashtra Assembly Election : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी पुण्यात जाहीर प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी बॅलसिंग पावर म्हणून सरकार बनविणा-या पक्षाला समर्थन देऊन जनतेला न्याय देऊ असे आश्वासन दिले. मतं ट्रान्सफर होत नसल्यामुळे इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक लढवली नसल्याचे मायावती म्हणाल्या.