Latest Nagpur News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देणे आमची राजकीय मजबुरी होती. मुस्लिम समाजाच्या विरोधात कायम भूमिका घेणारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला जायचे नव्हते. दुसरीकडे भाजपचा पराभव करायचा होता. विधानसभेतही आमची हीच भूमिका आहे. मात्र, आघाडीचे नेते प्रतिसाद देत नसल्याने स्वबळावर लढणे हा आमचा नाईलाज आहे, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सांगितले. शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
येथील एमआयएमतर्फे आयोजित महिलांचा मेळाव्यासाठी ते आले होते. इम्तियाज जलील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेले छोटेमोठे पक्ष आता बाहेर पडू लागले आहेत. यात एमआयएमचाही समावेश आहे. आघाडीचे नेते प्रतिसादच देत नसल्याने एमआयएमने