''आता ते शिवसेना ठाकरे गटाकडून उभे राहणार आहेत. ज्या नारायण राणे यांनी त्यांना मोठे केले त्यांच्यापासून ते दूर गेले.''
माहूर (जि. नांदेड) : पराभवाची हॅट्ट्रिक करायची असेल, तर राजन तेली (Rajan Teli) यांनी निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हान मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी येथे दिले. ते येथे रेणुकामातेच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तेली यांच्यावर टीका केली.