राजरत्न आंबेडकरांचा अन्यत्र भरलेला अर्ज वैध ठरला, तर मिरजेतील अर्ज अवैध ठरल्यामुळे यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेप घेण्यात आला.
मिरज : २८१, मिरज विधानसभा मतदारसंघासाठी (Miraj Assembly Constituency) अर्ज छाननीच्या दिवशी २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले, तर रिपब्लिकन युती पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Babasaheb Ambedkar) पणतू राजरत्न अशोक आंबेडकरांसह काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले मोहन वनखंडे, सागर वनखंडे, अपक्ष नंदा कोलप, अपक्ष अरुण धोत्रे यांचे उमेदवारी अर्ज काही त्रुटींमुळे अवैध ठरवण्यात आले.