Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

Jat Sangli: जत येथील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या बद्दलची ही खोडसाळ पोस्ट होती. यात ‘साप्ताहिक आपली बातमी’ नावाच्या व्हॅटस्ॲप ग्रुपवर लहू गडदे नावाच्या व्यक्तीने त्याच्या मोबाईलवरून ‘सकाळ’चे मास्टर हेड वापरून संबंधित उमेदवाराविषयी खोटी माहिती पसरवली आहे. ‘सकाळ’च्या पानाच्या डिजिटल पानाचा गैरवापर केला आहे. हा फेक न्युजचा प्रकार ‘सकाळ’ची बदनामी करणारा आहे.
Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल
Updated on

सांगलीः दैनिक ‘सकाळ’च्या मास्टर हेड व बोधचिन्हाचा गैरवापर करून समाजमाध्यमात खोट्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्नांबद्दल सोमवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयित आरोपी लहु गडदे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

यापुढे सकाळ माध्यम समुहाच्यावतीने विविध प्रकाशनांमधील माहिती मजकुराचा गैरवापर करणे, मजकुरात मोडतोड करून खोडसाळपणाने समाजामध्यमांवर प्रसिध्दी करणे असे प्रकार करणाऱ्यांची गंभीर दखल घेतली जाणार आहे. अशा प्रत्येक प्रकाराबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले जातील, असेही ‘सकाळ’ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.