वाशीम: तब्बल चार वेळा वाशीम विधानसभा मतदारसंघ भाजपच्या खाती जमा केलेले भाजपचे आमदार लखन मलिक यांची उमेदवारी पक्षाने कापल्याचे वृत्त समजताच आमदार लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले, पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली..अनुसुसचीत जाती प्रवर्गासाठी राखीव असलेला वाशीम विधानसभा मतदारसंघ आमदार लखन मलिक यांनी तब्बल चार वेळा जिंकला होता. यावेळी भाजप लोकसभेचा अनुभव गाठीशी असल्याने उमेदवार बदलणार नाही, अशी अटकळ लावली जात असताना भाजपच्या दुसऱ्या यादीत आमदार लखन मलिक यांना डावलून पक्षाने शाम खोडे यांना उमेदवारी जाहीर केली..उमेदवारी डावलल्याचं लक्षात येताच आमदार लखन मलिक यांना माहित होताच त्यांना अश्रू अनावर झाले. पक्षाने आपल्यावर अन्यायच केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्या आमदारकीच्या चार टर्ममध्ये आपणं कोणताही भ्रष्टाचार केला नाही, कोणतीही संपत्ती जमा केली नाही पक्षाचा विचार वाडी वस्त्यांवर पोचविला म्हणूनच जनतेने चार वेळा निवडून दिले, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.