Chitra Wagh And Rupali Chakankar: चित्रा वाघ ते रुपाली चाकणकर... 'या' 12 जणांना मिळणार आमदारकी? महायुतीचा फॉर्म्युला ठरला

MLC Appointed by Maharashtra Governor: या 12 जागांमध्ये सर्वाधिक 6 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मिळणार आहेत.
Chitra Wagh And Rupali Chakankar
Chitra Wagh And Rupali ChakankarEsakal
Updated on

Maharashtra Political Updates in Marathi: महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हापासून रखडलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे. कारण महायुती सरकार लवकरच राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची मिळून 12 नावे राज्यपालकांकडे पाठवणार आहे.

या 12 जागांमध्ये सर्वाधिक 6 जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मिळणार असल्याची बातमी साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

कोणाला मिळणार संधी?

दरम्यान महायुतीने यावेळी विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवून देणाऱ्या चेहऱ्यांनाच राज्यपाल नियुक्ती आमदरकी देण्याचे ठरवले आहे.

महायुती सरकार राज्यपालांना पाठवणाऱ्या 12 नावांमध्ये भाजपकडून गेल्या अनेक वर्षांपासून संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या चित्रा वाघ, विजया राहटकर, सुधाकर कोहळे, अतुल भोसले आणि बाळासाहेब सानप यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राहुल शेवाळे यांना पुन्हा संधी देणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये शेवाळे यांच्याबरोबर रवींद्र फाटक आणि मनिषा कायंदे यांनाही संधी मिळू शकते.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या 3 जागांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि बाबा सिद्दिकी यांना संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

Chitra Wagh And Rupali Chakankar
Bribery: लाचखोरीत नाशिक आघाडीवर, पुणे कितव्या क्रमांकावर? अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यास काय करायचे? ACB ने सांगितला उपाय

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली राज्यपाल कोट्यातील आमदारांची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही दिवसांतच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे आचारसंहीता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्ष राज्यपालांकडून या आमदारांच्या नियुक्त्या करून घेण्याच्या तयारीत आहेत.

आता या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणात्या पक्षातून कोणार संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी सत्ताधारी ज्यांचा विधानसभा निवडणुकीत फायदा होणार त्यांनाच संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.

Chitra Wagh And Rupali Chakankar
Sharad Pawar : 'दोन महिन्यांनंतर राज्यातील परिस्थिती बदलेल'; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.