विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी थंडावणार आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार होती, पण ती आत्ता रद्द करण्यात आली आहे. याबाबत खुद्द राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज ठाकरे म्हणाले की, 17 तारखेच्या सभेची अजूनही परवानगी आलेली नाहीय. आणि दीड दिवसात सभेसाठी तयारी करणे शक्य नाही करणे शक्य नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवरची सभा आम्ही करणार नाही.