Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून आचारसंहिता भंग होण्याचे प्रकार घडतात. यावर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशिष्ट कालावधीत कार्यवाही करून त्याचे अहवाल सादर करावे लागणार आहेत. याकरिता स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दर २४ तासांत, ४८ तासांत व ७२ तासांत करावयाच्या कार्यवाहीबाबत भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशांचे सर्व शासकीय विभागांनी काटेकोरपणे पालन केले जाते की नाही हे पाहिले जाणार आहे.
कोणत्याही कार्यालयामध्ये, शासकीय मालमत्तेवर राजकीय व्यक्तीचे व मतदारावर प्रभाव टाकणारे पोस्टर, फलक, छायाचित्रे राहणार नाहीत याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे.