मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, मद्य, अमली पदार्थ व सोन्या-चांदीची चोरटी वाहतूक यातून १५ ते २४ ऑक्टोबरपर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या २४ तासांत ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.