मोहोळ : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या दिवशी काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागणा-या घटनाही घटल्या, मात्र सोलापूरमधील मोहोळमधून धक्कादायक घटना पुढे आली आहे. मतदान प्रक्रियेतील ईव्हीएम अॅपच्या माध्यमातून हॅक करत असल्याच्या संशयावरुन नागरिकांनी दोन परप्रांतीय तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून 14 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.