Morshi Assembly Election 2024: मोर्शी विधानसभेत तीन लाख मतदार ३११ मतदानकेंद्र ! प्रशासनाची तयारी सुरू

Maharashtra Assembly Election 2024 : मोर्शी विधानसभा निवडणुकीत १ हजार ८५२ दिव्यांग व ८५ वर्षांवरील ४ हजार ५६५ वयोवृद्ध मतदारांचे मतदान आहे. त्यांनी मागणी केल्यास मतदान अधिकारी त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेणार आहेत.
Morshi Assembly Election 2024
Morshi Assembly Election esakal
Updated on

Morshi Assembly Election: मोर्शी, ता. २२: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली आहे. मोर्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मोर्शी व वरुड तालुक्यातील शहरी व ग्रामीण मिळून एकूण ३११ मतदानकेंद्रांवर २० नोव्हेंबर ला मतदान होणार आहे. त्यासाठी १४९४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारसंघामध्ये १ लाख ४८ हजार ५५७ पुरुष व १ लाख ४१ हजार ७८२ महिला, असे एकूण २ लाख ९० हजार ३३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.