अमरावती : जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी मोर्शी मतदारसंघात महायुतीत होणाऱ्या मैत्रीपूर्ण लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही लढत कुणाच्या पथ्यावर पडणार, असा प्रश्न करण्यात येत आहे. बलाढ्य उमेदवारांचा या मतदारसंघात चांगलाच कस लागणार आहे.