ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अनेक फसव्या योजना का जाहीर केल्या, याचे उत्तर द्यावे.
वाई : आपल्या समोर महायुतीचा (Mahayuti) उमेदवार कितीही तगडा आणि मातब्बर असला, तरी त्याला घरपोच करण्याची मनात इच्छा आणि आपली एकजूट असेल, तर वाई विधानसभा मतदारसंघात परिवर्तन अटळ आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी येथे केले. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या यशवंत विचाराची प्रतारणा करणाऱ्या गद्दारांना मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.