मुक्ताईनगर मतदारसंघात ३० वर्षांपासून भाजपचे एकनाथ खडसे आमदार होते, पण अंतर्गत कलहामुळे २०१९ ला त्यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली.त्यांचा अवघ्या एक हजार ९०० मतांनी पराभव झाला होता.
आता रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. विरोधात शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांना, तर वंचित आघाडीकडून संजय ब्राह्मणे, अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यासह दोन रोहिणी व दोन चंद्रकांत पाटील अशा सारख्या नावांच्या उमेदवारांसह तब्बल १७ उमेदवार रिंगणात आहेत.