मुंबईतील 36 जागांसाठी मारामारी का? शेवटी स्वबळावर लढणार पण? ठाकरे 25, पवार गट 6, काँग्रेसचा 15 जागांवर दावा, गणित कसं जुळणार?

Maha Vikas Aghadi's Seat Sharing : महाविकास आघाडील घटक पक्षांच्या मागणीनुसार ४६ जागा होत आहेत. त्यामुळे स्वबळावर पक्ष लढणार का, अशी चर्चा देखील रंगली आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Discuss Seat Sharing for Mumbai
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Discuss Seat Sharing for Mumbai esakal
Updated on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या राज्यात प्रमुख लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत आलेल्या पराभवामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यात लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. या दोन्ही आघाडींमध्ये जागा वाटपावरून मोठा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक चर्चेत राहणार आहे. सर्व पक्षांसाठी आर्थिक राजधानी मुंबई महत्वाची आहे. मुंबईसाठी दोन्ही आघाड्यांमधील पक्ष मैदानात उतरले आहेत. शिवसेनेचा गड म्हणून मुंबईची ओळख आहे.

उद्धव ठाकरे गटाचे २५ जागांवर लक्ष-

आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट मुंबईच्या 36 विधानसभा मतदार संघात किमान 25 जागा लढवण्याची तयारी करत आहे. ठाकरे गटाने मुंबईतील त्यांच्या बालेकिल्ल्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नेहमीच मुंबईत प्रभावी राहिली आहे, आणि उद्धव ठाकरे हे हे स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. बांद्रा पूर्व, दहिसर, अंधेरी पूर्व अशा काही ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा १५ जागांवर दावा-

काँग्रेस पक्ष देखील मुंबईत महत्त्वाची भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार आमदार निवडून आले होते. यंदा काँग्रेस 13 ते 15 जागांवर दावा करू शकते. कुलाबा, मुंबा देवी, भायखळा, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी, बांद्रा, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, मालाड पश्चिम आणि जोगेश्वरीसह काही जागांवर काँग्रेसची दावे आहेत. वर्षा गायकवाड, अमिन पटेल, झिशान सिद्दीकी आणि अस्लम शेख हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Discuss Seat Sharing for Mumbai
Supreme Court : आमदार अपात्रता सुनावणी ऑक्टोबरपर्यंत लांबणार ? शिवसेना व ‘राष्ट्रवादी’च्या पक्ष व चिन्हावरही निर्णयाची शक्यता

शरद पवार गटाच्या ६ जागांवर दावा-

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील यावेळी मुंबईत 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत आहे. मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा, अनुशक्ती नगर-कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर-मानखुर्द या विधानसभा मतदारसंघांवर पवार गटाचा दावा आहे.

महाविकास आघाडील घटक पक्षांच्या मागणीनुसार 46 जागा होत आहेत. त्यामुळे स्वबळावर पक्ष लढणार का, अशी चर्चा देखील रंगली आहे.

मुंबईचे राजकीय महत्त्व-

महाराष्ट्राचे राजकारण मुंबईतून चालते. मुंबईत सत्ता तर राज्यात सत्ता असे समीकरण राजकारणी मानतात. भाजपने देखील मुंबईवर विशेष लक्ष दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांना मुंबई जिंकायची आहे. त्यामुळे त्यांचे दौरे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे भाजप ताकदीने मैदानात उतरणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातूनही मुंबई महत्वाची आहे, कारण देशाचे अर्थकारण देखील मुंबईवर निर्भर आहे.

महाविकास आघाडीच्या रणनीतीत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जागांवरील दावे महत्त्वाचे ठरणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागांसाठी संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Discuss Seat Sharing for Mumbai
Nilesh Lanke: निलेश लंकेंची खासदारकी जाणार? विखेंच्या आव्हानानंतर हायकोर्टात सुनावणी, न्यायाधीशांनी काय दिले आदेश?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.