मुंबई : राज्यातील निवडणुकीचे निकाल देशाचे ‘नॅरेटिव्ह’ची दिशा निश्चित करतील असे मानले जात असल्याने काँग्रेस अत्यंत तयारीने या निवडणुकीत उतरली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी जागावाटपात कोणतेही वाद डोकावू न देता आघाडी मजबूत करा असा निर्णय दिल्लीने कळविल्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे नाव पुढे आले असून पक्षाकडून तेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.