मुंबई: महाविकास आघाडीतील नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याच्या आरोपावरून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी हे आरोप करत, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी राऊतांना तीव्र प्रत्युत्तर दिले.