महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे एकमेकांवर शाब्दिक हल्लेही तीव्र झाले आहेत. सोमवारी मुंबईतील चांदिवली परिसरात महायुती आणि मविआ यांच्यातील तीव्र राजकीय कटूता पाहायला मिळाली. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा याच भागातून जात होता. ताफा अडवून गद्दार अशा घोषणा देण्यात आल्या.