नागपूर : प्रचार संपल्यामुळे राजकीय स्टार प्रचारकांसह नेत्यांना आपल्या मतदारसंघात जावे लागेल, अन्यथा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच मतदान केंद्रांवर कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाचा असल्याचे त्यांनी सांगितले.