गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद प्रलंबित आहे. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह कर्नाटकातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करावीत, अशी महाराष्ट्राची मागणी आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादातून (Maharashtra-Karnataka Border Dispute) कर्नाटकने सीमाभागातील शाळेसह सरकारी कामात केलेली कन्नड सक्ती मागे घ्यावी, यासाठी महाराष्ट्राचे एकीकडे प्रयत्न सुरू असताना, विधानसभा निवडणुकीत चंदगड मतदारसंघासाठीच्या (Chandgad Constituency) टपाली मतपत्रिकेवर उमेदवारांची नावे चक्क कन्नडमध्ये छापण्यात आली आहेत. निवडणूक यंत्रणेच्या या अजब कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.