नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. या अनुषंगाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या घरोघरी भेटींसोबतच कॉर्नर बैठक, वेगवेगळ्या समाजांचे मेळावे, सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्यास राजकीय पक्षांकडून भर दिला जात आहे.