Assembly Elections 2024: धर्म, राजसत्ता एकत्र आल्यास विकास; सेवेतून सत्तेत जाण्याचा निर्धार !

Degalur Vidhan Sabha elections 2024: डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज; देगलूरमधून लढविणार विधानसभा
Degalur Vidhan Sabha elections 2024
Degalur Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

नांदेड: खांद्यावर हिंदुत्वाची पताका घेतल्यानंतर १६ वर्षांपासून सेवा सुरूच आहे. धर्म आणि राजसत्ता एकत्र आल्यानंतर विकास होतो, हे लक्षात आले आहे. त्यामुळे सेवेतून सत्तेत जाण्याचा निर्धार केला आहे, असे मत मुखेड गणाचार्य मठाचे मठाधिपती डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले. देगलूर-बिलोली मतदारसंघात अनुयायांची संख्या अधिक आहे.

याच मतदारसंघातून विधानसभा लढविणार आहे. यासंबंधी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. ते निश्चितच विचार करतील. मात्र, ऐनवेळी डावलण्यात आल्यास योग्य निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

‘सकाळ’च्या ‘थेट-भेट’ उपक्रमात शनिवारी (ता. पाच) डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज बोलत होते. पुढे ते म्हणाले, मागच्या सहा महिन्यांपासून अनुयायी आणि वरिष्ठांचा विचार घेऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात आल्यानंतर खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. धर्मसत्तेला राजकारणाची जोड मिळाल्यास तळागाळातील समाजासाठी चांगले व भरीव काम करता येते. त्यामुळे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून भाजपचा इच्छुक उमेदवार म्हणून माझा दावा आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही माझ्या नावाची चर्चा होती. परंतु, त्यावेळी संधी मिळाली नाही. त्यावेळचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पुन्हा संधी चालून आली होती. मात्र, परिस्थिती वेगळी असल्याने अंतापूरकर यांच्या विरोधात निवडणूक लढणे योग्य वाटले नाही. यावेळी मात्र मी प्रमुख दावेदार आहे. उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे बायोडेटा सुपूर्द केला आहे.

राजकारण्यांनी विकासापासून दूर ठेवले

देगलूर-बिलोली मतदारसंघाला राजकारण्यांनी मागास ठेवण्याचे काम केले आहे. देगलूरची काही प्रमाणात प्रगती झाली. औद्योगिक वसाहतीत एक सूतगिरणी वगळता मोठा उद्योग आला नाही. बिलोलीला तर औद्योगिक वसाहतच नाही. माझ्यासारखा भगवाधारी राजकारणात आल्यास दोन्ही तालुक्यांना सुजलाम्-सुफलाम् करता येईल. विशेषतः बिलोली तालुक्यातील शिक्षण, शेती आणि रोजगाराचे प्रश्न मार्गी लावता येतील, असेही डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांनी स्पष्ट केले.

सीमावर्ती राज्यांमध्ये शिष्य समुदाय

मुखेडचे गणाचार्य मठ वीरशैव लिंगायत सांप्रदायाचे मठ आहे. नांदेड, लातूर, निजामाबाद, बिदर म्हणजे तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ६०-७० हजार शिष्य आहेत. माझा शिष्य परिवार मोठा असून हक्काचा आहे. मी मुखेडमध्ये कमी आणि देगलूर-बिलोली भागातच जास्त वावरतो. या मतदारसंघातील १५० ते २०० गावांत शिष्य परिवार आहे. तो मला निश्चितच मदत करणार, असे डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले.

Degalur Vidhan Sabha elections 2024
किस्से निवडणुकीचे! हरिभाऊंचा गेम झाला अन् एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार झाल्या

...तर वरिष्ठांशी चर्चा करणार

देगलूर-बिलोलीमध्ये महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे महायुतीकडूनच उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्यास अनुयायी आणि वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार. महाविकास आघाडीची उमेदवारी घेणार का? यावर महाराज म्हणाले, त्यांची आणि माझी विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे ते शक्य नाही.

राजकारण चांगले, काही राजकारणी खराब

राजकारण चांगलेच आहे. पण, काही राजकारण्यांमुळे ते गढूळ झाले आहे. गढूळ झालेले राजकारण शुद्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील. सत्तेत आल्यानंतर काहीतरी चांगले करता येते, असा माझा समज आहे. मी मठाधिपती असलो तरी उच्चशिक्षित असून २०१६ ला पीएच.डी. मिळवली आहे. शिवाय समतावादी विचाराचा गाढा अभ्यासक आहे. माझ्याकडे जाती-पातीचे बंधन नाही. मी सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, असेही डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज म्हणाले.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.