विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज अकोल्यात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी राम मंदिराच्या निकालाच्या मुद्द्यावर पुन्हा वक्तव्य केले आहे. तसेच 9 नोव्हेंबर या तारखेची आठवण करून दिली आहे. विदर्भाचे आशीर्वाद माझ्यासाठी नेहमीच खास राहिले आहेत. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत महाआघाडीसाठी मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे ते म्हणाले.