नवी मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी आहे. तसेच, काही मार्गांवर वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.