मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपच्या नेत्यांनी विरोध केला आहे. मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदशी संबंध असल्याचा आरोप या नेत्यांनी वारंवार केला आहे. यापार्श्वभूमीवर आपल्यावर अशा पद्धतीचे खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा मलिक यांनी दिल आहे.