मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विधानसभा निवडणुकीसाठी आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधून तर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. .या जाहीरनाम्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम १,५०० वरून २,१०० रुपयांपर्यंत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यात येणार आहे. भात उत्पादकांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.शिवाय अडीच लाख नोकऱ्या, सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीजबिल ३० टक्के कमी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्ते बांधण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ३६ पानांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून या जाहीरनाम्याचे शीर्षक ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ असे आहे..पक्षाच्या जाहीरनाम्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवीत असलेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय महाराष्ट्र घोषणापत्रही प्रकाशित करण्यात आले. महायुतीच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दशसूत्री जाहीर केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये अकरा नवीन आश्वासने समाविष्ट करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या सर्व मतदारसंघांत एकाचवेळी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.बारामतीतून अजित पवार, गोंदियामधून राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार प्रफुल पटेल, नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन जाहीरनामा प्रसिद्ध केला. उमेदवार दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते..राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, स्टार प्रचारक सयाजी शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर आदी उपस्थित होते. प्रशिक्षणाद्वारे एक लाख विद्यार्थ्यांना दहा हजार मासिक विद्यावेतन, अंगणवाडी आणि आशा सेविका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये मासिक वेतन, वृध्द पेंशनधारकांना महिन्याला २,१०० रुपये अशी आश्वासनेही दिली आहेत..ठळक वैशिष्ट्ये1) लाडकी बहीण योजनेत १,५०० वरून २,१०० रुपयांपर्यंत वाढ2) भात उत्पादकांसाठी प्रति हेक्टर २५ हजार बोनस3) अडीच लाख नोकऱ्या देणार4) ग्रामीण भागात ४५ हजार पाणंद रस्त्यांचे बांधकाम5) अत्यावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवणार#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.