Vidhansbha Election : विधानसभेच्या रणधुमाळीत शरद पवारांची क्रेझ! राज्यभरातून मिळाले इच्छुकांचे 'इतके' अर्ज

Assembly Election Maharashtra Politics News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी इच्छूकांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर राजकीय पक्षांकडून कुठे कोणाला संधी देण्यात यावी यासाठी चाचपणी सुरू आहे. दरम्यान राजकीय पक्षांकडून इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागवण्यात येत असून मुलाखती देखील घेतल्या जात आहेत. पण या सगळ्यात शरद पवारांची जादू पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत 'तुतारी' हाती घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची बाब समोर आली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होते आहेत. यादरम्यान पुण्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू आहे. यादरम्यान पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळावी, यासाठी महाराष्ट्रातून तब्बल १६०० अर्ज प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar
Who is Tara Bhawalkar : ९८व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी तारा भवाळकर यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या सलग तीन दिवस मुलाखती घेणार आहेत. शनिवारी (ता. ५ ऑक्टोबर) दिवसभर मराठवाड्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या तर आज (रविवार, ६ ऑक्टोबर) दिवसभर विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. सोमवारी सकाळी इंदापुर येथील हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या सभेनंतर दुपारी पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील.

Sharad Pawar
गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या पक्षातून लढण्यासाठी महाराष्ट्रातून १६०० अर्ज आले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून तब्बल ६८ अर्ज करण्यात आले आहेत. मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी शरद पवार यांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.