मावळ
सुनील शंकरराव शेळके
विद्यमान आमदार
मावळ विधानसभा
शिक्षण - इयत्ता दहावी
शेळके कुटुंब हे पूर्वीपासून संघ परिवाराशी जोडलेले आहे. सुनील शेळके यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले. मावळ तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालये, तहसील कार्यालय, नगर परिषद इमारत, आश्रमशाळा इत्यादी मोठी विकास कामे झाली आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा असणारा ‘ग्लास स्कायवॉक’ सारखा मोठा प्रकल्प तालुक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे.