Katol Assembly Elections 2024: काटोल विधानसभा निवडणुकीत कोणाचे पारडे भारी; राष्ट्रवादीसह काँग्रेस,भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी

Katol Vidhan Sabha elections 2024: 'अभी नही तो कभी नहीं' असा नारा देत अनेक नवीन इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून त्यादृष्टीने काटोल विधानसभा क्षेत्रात फिरायला सुरवात केली आहे.
Katol Vidhan Sabha elections 2024
Katol Vidhan Sabha elections 2024sakaj
Updated on

काटोल: काटोल विधानसभा क्षेत्रात निवडणूक जवळ आल्याने नवनवीन चेहरे पुढे येत आहेत. 'अभी नही तो कभी नहीं' असा नारा देत अनेक नवीन इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून त्यादृष्टीने काटोल विधानसभा क्षेत्रात फिरायला सुरवात केली आहे.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यात नवे चेहरे यशस्वी होतात की पुन्हा एकदा जुनेच चेहरे समोर येतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काटोल विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी अनेक नवीन चेहरे मतदारसंघात उतरणार आहेत. जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतशी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी नव्यासोबत अनेक जुन्या इच्छुकांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढविला आहे.

भाजपकडून जुने आणि नवीन इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसत आहे. त्यामध्ये माजी आमदार आशिष देशमुख हे पुन्हा भाजप मध्ये परतले असून, भाजपच्या संघटनेमध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत आहे. काटोल विधानसभेच्या जनतेच्या संपर्कात आहे. तसेच चरणसिंग ठाकूर यांनी भाजपने मागील दोन वर्षांपासून संघटनेमध्ये विधानसभेचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिली होती, पण थोड्या फरकाने पराभव पत्कारावा लागला होता. याच बरोबर अविनाश ठाकरे, जि.प. सदस्य समीर उमप, संदीप सरोदे हे देखील उमेदवारी साठी प्रयत्नशील आहे.

Katol Vidhan Sabha elections 2024
Nandurbar Vidhan Sabha Election 2024 : नवीन चेहरे रिंगणात उतरण्यासाठी सज्ज! नंदुरबार जिल्ह्यात नव्या-जुन्यांकडून तयारीला वेग

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला काटोल विधानसभेतील जनतेने लीड दिले नसले तरी फक्त पाच हजार मतांनी येथे युतीचा उमेदवार मागे राहिल्याने इच्छुक वाढले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने योग्य उमेदवाराला रिंगणात उतरवल्यास व संपूर्ण पक्ष त्याच्या मागे उभा राहिला तर लढत चुरशीची होईल असे चित्र स्पष्ट दिसत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या मतदार संघावर दावा करीत त्यांच्या नेते व कार्यकर्ते यांना कामी लागण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याने त्यांच्यात देखील इच्छुकांची गर्दी वाढली आहे.

यात जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सतीश हे आघाडीवर असले व त्यांना अजित पवार यांनी लीड करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे यांनी देखील कंबर कसली आहे. काटोल मतदारसंघात सर्व पक्षाच्या काही कार्यकर्ते व नेते यांनी एकत्र येत स्वराज्य ( सतरंजी ) संघटना तयार केली आहे. मागील काही वर्षांपासून ते कार्यरत देखील आहे. अशात येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची भूमिका देखील महत्त्वाची राहणार आहे.

पिता पुत्राची उमेदवारीसाठी चढाओढ

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) पक्षाची या मतदारसंघात पकड आहे. २०१४ चा अपवाद वगळता माजी मंत्री अनिल देशमुख या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत आहे. २०१४ मध्ये देखील त्यांना त्यांच्या पुण्याकडूनच पराभव स्वीकारावा लागला. आता ते पुन्हा जोमाने मतदारसंघात कार्यरत आहे. तसेच त्यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य सलिल देशमुख देखील पूर्ण जोमाने मागील काही वर्षांपासून मतदारसंघात विकासकामांना गती देताना दिसत आहे. अशात महाविकास आघाडीत ही जागा शरदचंद्र पवार गटाला गेली तर उमेदवार अनिल देशमुख असतील की पुत्राला पुढे करून स्वतः दुसरा मतदारसंघ निवडतील किंवा स्वतः ते काटोल मध्येच राहून पुत्र सलिल देशमुख साठी लागून असलेल्या मोर्शी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दावा करतील का? अशी चर्चा सुरू आहे.

कॉंग्रेसलाही हवाय ‘चान्स

काँग्रेसचे याज्ञवल्क्य जिचकार यांनी देखील काँग्रेसला या मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. हा मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसला सुटण्याची त्यांना आशा आहे. असे काही झाले नाही तरी काटोल मतदारसंघाच्या विकासाचे व्हीजन घेऊन ते निवडणूक लढविणार यावर ठाम आहे. ३० वर्षीय याज्ञवल्क्य जिचकार यांच्या मागे त्यांचे वडील स्व. श्रीकांत जिचकार यांचा मोठा चाहता वर्ग आहे. तसेच त्यांचे मागील काही वर्षांपासून सुरू असलेले प्रतिष्ठानच्या मार्फत होणाऱ्या सामाजिक कार्यामुळे ते मतदारसंघात परिचित आहे.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.