नेवासे शहर : ‘‘ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना सर्व अनुकूल असताना, तसेच कार्य दमदार असतानाही भाजपने त्यांचा घात केला. कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने राहावे मात्र, नेत्यांनी निष्ठा विकावी हे सगळं विचित्र राजकारण सुरू आहे. प्रत्यक्षात निष्ठा ह्या जनतेवर ठेवाव्यात आणि ती मुरकुटे यांनी ठेवली आहे. इथला महायुतीचा उमेदवार सगळे पक्ष फिरून भाजपमध्ये आले आणि तिकिटासाठी शिवसेनेत गेले,’’ अशी टीका तिसऱ्या आघाडीचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी केली.