निलंगा : निलंगा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सोमवारी (ता. चार) रोजी अखेरच्या दिवशी अशोक पाटील निलंगेकर व त्यांच्या पत्नी संगीता पाटील निलंगेकर यांच्यासह शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे, शोभा बेंजर्गे आदींनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. या नेत्यांच्या माघारीने निलंगा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आता १३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.