भारतीय जनता पार्टीच्या वाढत्या विस्ताराबरोबरच काही आव्हानेही समोर येत आहेत, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. भाजपमध्ये होत असलेले प्रवेश, बंडखोरी केलेल्या नेत्यांबाबत गडकरींनी चिंता व्यक्त केली. भाजपच्या शुद्धतेसाठी 'कीटनाशक फवारणी'ची आवश्यकता असल्याचे गडकरी म्हणाले.