''लोकसभेला बारामतीकरांच्या सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आज ओबीसी एकवटला आहे, त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे.''
Maharashtra Assembly Elections 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवार पाडणार असं म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज (सोमवारी) सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.