उल्हासनगर: महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,काँग्रेस,आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अशी महाविकास आघाडी आहे. मागच्या महिन्यातच उल्हासनगर विधानसभा निवडणूक ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवणार अशी घोषणा युथ आयकॉन ओमी कलानी यांनी केली होती.मात्र राष्ट्रवादीची यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचे स्थानिक नेते एकवटले असून त्यांनी ओमी कलानी यांच्यासाठी फिल्डिंग लावून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
त्यासाठी वरिष्ठांचा आदेश असण्याचे बोलले जात असून त्यामुळे ओमी यांचे तिकीट कन्फर्म मानले जात आहे.