ठाणे : दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी हि अधिक रंगतदार होत आहे. प्रचार दौरे, चौक सभा, मतदारांच्या घरोघरी जावून गाठीभेटी घेणे, मॉर्निंगवॉक आदी विविध प्रकारे उमेदवारांकडून निवडणुकीचा प्रचार सुरु आहे..अशातच जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चक्क भाजपचे जेष्ठ नगरसेवक यांच्या कार्यालयात जावून त्यांची भेट घेतात. तसेच त्यांच्या खुर्चीत बसून गप्पा रंगत असल्याची व्हीडीओ क्लिप समाज मध्यमवर चांगलीच प्रसारित झाला आहे. यावरून मतांच्या जोगव्यासाठी उबाठा गटाच्या उमेदवाराने भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता, अंतिम टप्प्यात येवून पोहोचला आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे..त्यामुळे उमेदवारांच्या हाती अवघे काही दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिले आहे. हिच बाब लक्षात घेवून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मॉर्निंगवॉक, प्रचार दौरे, चौक सभांसह मतदारंच्या गाठीभेटी घेण्याकडे आपला मोर्चा वळविला असून तिन्ही उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. अशातच ठाणे विधानसभा मतदार संघामध्ये भाजपचे उमेदवार संजय केळकर, शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसेचे उमेदवार अविनाश जाधव या तीन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. या तिरंगी लढतीमुळे येथे अटीतटीचा सामना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशातच ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे यांनी प्रचारादरम्यान एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक आणि भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची घेतली असून त्याचे चित्रफित समाजमाध्यांवर प्रसारित झाली आहे..केवळ मतांच्या जोगव्यासाठी राजन विचारेंची भाजप कार्यालयात पायधूळ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.२०१७ च्या निवडणुकीत पवार यांच्या पॅनलने विचारेंचे पुतणे मंदार विचारे यांचा पराभव केला. तसेच नारायण पवार हे पुर्वी पाच वेळा काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून निवडुण आले असून गेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुक लढली आणि या निवडणुकीत ते निवडुण आले.नारायण पवार हे काँग्रेस पक्षात होते, तेव्हापासून पवार आणि विचारे यांच्यात राजकीय वैर आहे. हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक राहिलेले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.