धाराशिव : उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुतीतील बंडखोरी रोखण्यात यश आले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी ३१ जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता १२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांत या मतदारसंघात अटीतटीची लढत होत आहे.