पंढरपुरातील लढतीमध्ये भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोण बाजी मारणार याकडेच लक्ष लागले होते. मात्र या निवडणूकत आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचा फायदा भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजयी मिळवला..विधानसभा मतदारसंघातील २०२४ ची निवडणूक यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये दुरंगी सामना झाला. या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघातून भाजपाचे समाधान आवताडे यांनी 121362 मतांनी विजय मिळवला आहे. तर काँग्रेसचे भगीरथ भालके113297 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनिल सावंत 111468 यांना पराभूत झाले आहेत. .राजकीय चित्रात बदलयंदाच्या जागा वाटपात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचे समोर आले. त्यामुळेच काॅंग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आरोग्यमंत्री डाॅ.तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथे महाविकास आघाडीने मैत्रीपूर्ण लढत असे गोंडस नाव दिले आहे..२०१९ मध्ये काय झाले होते?२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एनसीपीचे भरत भालके यांनी १३,००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर होते भाजपचे सुधाकर परिचारक आले होते..पंढरपूर विधानसभा मतदारसंघ स्थानिक समस्यापंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन तालुके असून येथे, साखर कारखानदारांचा हा तालुका आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकरी आणि कारखानदारी हा फॅक्टर येथे महत्वाचा ठरतो.तसेच दूध संघ, कारखानदारी, बाजार समिती अशा सहकार खात्याशी संबंधित वजनदार उमेदवार येथे मुख्य आहेत. त्यामुळे, ऊस उत्पादक शेतकरी, पंढरी नगरीचा विकास आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक या मतदारसंघात महत्वाचे आहे..मतदारांची संख्या२०१९ विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघात एकूण ३,३४,१२० मतदार होते, तर त्यापैकी २,३९,६९१ मतदात्यांनी मतदान केले होते. या मतदारसंघात १४% पेक्षा जास्त अनुसूचित जाती , २% पेक्षा जास्त अनुसूचित जमाती आणि सुमारे ५% मुस्लिम मतदार आहेत. पंढरपूर मध्ये सुमारे ७०% ग्रामीण आणि ३०% शहरी मतदार आहेत..पंढरपूर शहर विधानसभेचा इतिहासपंढरपूर मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचा दबदबा होता. काँग्रेसचे सुधाकर परिचारक या मतदारसंघाचे २४ वर्षे आमदार होते. ते एनसीपी मध्ये देखील होते. व १९५७ मध्ये प्रजा सोशलिस्ट पार्टीचे रघुनाथ राऊळ येथे आमदार झाले होते. नंतर १९६२, १९६७, १९७२ आणि १९७८ मध्ये काँग्रेसचे पाटील या मतदारसंघाचे आमदार झाले.आणि १९८० मध्ये काँग्रेसचे पांडुरंग भानुदास डिंगारे आमदार झाले. १९८५ ते २००९ पर्यंत सुधाकर परिचारक यांनी या मतदारसंघातून निवडणूक जिंकली.व २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भालके भरत यांची सलग ३ वेळा निवड झाली होती. आणि सातत्याने आमदार झाले.मात्र २०२० मध्ये आमदार भालके यांच्या निधनामुळे २०२१ मध्ये पोटनिवडणूक झाली. आणि २०२१ मध्ये झालेल्या उपचुनावात भाजपच्या समाधान आवताडे यांनी विजय मिळवला होता..१९५२ ते २०१९: पंढरपूरचे विजेते कोण ?२०२१ - समाधान आवताडे ( भाजप )२०१९ - भालके भरत ( काँग्रेस )२०१४ - भालके भरत ( काँग्रेस )२००९ -भालके भरत ( काँग्रेस )२००५ -सुधाकर परिचारक ( काँग्रेस )२००० -सुधाकर परिचारक ( काँग्रेस )१९९५ - सुधाकर परिचारक ( काँग्रेस )१९९० - सुधाकर परिचारक ( काँग्रेस )१९८५ - सुधाकर परिचारक ( काँग्रेस )१९८० - पांडुरंग भानुदास डिंगारे (काँग्रेस )१९७८ - औदुम्बर कोंडिबा पाटील (काँग्रेस)१९७२ - औदुम्बर कोंडिबा पाटील (काँग्रेस)१९६७ - औदुम्बर कोंडिबा पाटील (काँग्रेस)१९६२ - औदुम्बर कोंडिबा पाटील (काँग्रेस)१९५७ - रघुनाथ राऊळ (प्रजा सोशलिस्ट पार्टी) .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.