अर्ज माघार घेण्यासाठी आज दुपारपर्यंत वेळ असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये योग्य समन्वय राखून कुणाला संधी देणार की भविष्यातील राजकीय पुनर्वसनाचे लॉलीपॉप दाखवणार याकडे जनतेचे लक्ष लागले.
मंगळवेढा : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर विधानसभेसाठी कामगिरी करण्याच्या तयारीत असलेल्या महाविकास आघाडीत पंढरपुरातच (Pandharpur Assembly Election) बिघाडी झाली असून यावर आघाडी की बिघाडी यावर काही तासांचा अवधी शिल्लक असून याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.