वर्धा : वर्धा- सेलू विधानसभेचे महायुतीचे भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत केलेल्या विकास कामांमुळे ते ज्या भागात जातात तिथे त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. त्यांच्या पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी (ता. सात) सिंदी (मेघे) व शहरातील प्रभाग १२ मध्ये सकाळी रॅली काढण्यात आली. यात राष्ट्रभाषा रोड, गौरक्षण परिसर, सानेवाडी, सिंदी (मेघे) येथील राठी ले-आऊट, राष्ट्रभाषा परिसर, हिंदनगर भागात त्यांचे स्वागत झाले.