राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशात सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. दरम्यान गुजरातहून महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या परेश धनानी यांना नाशिक येथे हार्ट अटॅक आला आहे. त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्यावर एँजिओप्लास्टी करण्यात आली असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
कही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 14 जागा जिंकत काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. आता विधानसभेतही बाजी मारण्यासाठी काँग्रेसने जोर लावला आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरातील काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारासाठी राज्यात येत आहेत.