परळी वैजनाथ : परळी विधानसभेच्या हायहोल्टेज लढतीमध्ये धनंजय मुंडे व राजेसाहेब देशमुख यांच्यात दुरंगी लढत होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेभाऊ फड यांनी माघार घेतल्याने ही दुरंगी लढत होणार आहे. राजेभाऊ फडसह दिलीप बीडगर, प्रभाकर वाघमोडे, राजेश देशमुख यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.