Ladki Bahin: प्रचारासाठी महायुतीचं ब्रम्हास्त्र! लाडक्या बहिणी उतरल्या मैदानात; कारण काय? पडद्याआड काय घडतंय?

Mahayuti Candidate Campaign: उमेदवारांची नावे घोषित होताच आता प्रचाराला सुरूवात केली आहे. तसेच अर्ज भरण्यासाठीही उमेदवार रॅली काढत आहेत. यात मोठे शक्तीप्रदर्शन केले जात आहे.
 Mahayuti Candidate Campaign
Mahayuti Candidate CampaignESakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढत आहे. राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. कोणत्या नेत्याला तिकीट कुठून मिळणार आणि कोणाचे कार्ड क्लिअर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर ज्यांना आतापर्यंत तिकीट मिळाले आहे, ते उमेदवार मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करत आहेत. प्रचारात महायुती वरचढ ठरत असलेली दिसून येत आहे. प्रचारासाठी महायुतीचं ब्रम्हास्त्र ठरलं आहे. महायुतीकडून लाडक्या बहिणी प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. यामुळे महिलांचा मोठा पाठिंबा हा महायुतीला असल्याचे दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे हा प्रभाव झाला असं म्हणणं आता वावगं ठरणार नाही.

महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडीला अद्यापही सर्व जागांवर उमेदवार उभे करता आलेले नाहीत. महायुतीने अद्याप 28 जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत, तर महाविकास आघाडी अर्थात एमव्हीएने अद्याप 28 जागांवर उमेदवार उभे केलेले नाहीत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरी यादी जाहीर करून आणखी 20 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्याचवेळी काँग्रेसने महाराष्ट्रासाठी 14 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. आज भाजपने २५ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

 Mahayuti Candidate Campaign
Kothrud Assembly Election : चंद्रकांत पाटीलांचा जीव भांड्यात! बंडखोराने घेतली माघार, पेढा भरवून केलं मनोमिलन

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. यासाठी आता सर्व पक्षाचे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर अनेक मोठे निर्णय घेतले. तसेच जनतेसाठी काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेच्या अग्रस्थानी होती. महिलांना आर्थिक फायदा देणाऱ्या या योजनेवर महायुतीची भिस्त आहे.

याचमुळे विविध नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनामध्ये महिलांची उपस्थिती हादेखील जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असल्याची चर्चा आहे.

 Mahayuti Candidate Campaign
Tata-Airbus: नागपूरच्या टाटा एअरबस प्रोजेक्टचे गुजरातला उद्घाटन? काँग्रेसचा मोठा आरोप; "महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ..."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.