"हर्षद जिंकला तर महाराष्ट्र जिंकणार आहे आणि तो हरला तर महाराष्ट्र हरणार आहे."
मल्हारपेठ : बाळासाहेब देसाई व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे चांगले संबंध होते म्हणून आम्ही शंभूराज देसाई यांना शिवसेनेत घेतले. आपण त्यांना गृहराज्यमंत्री केले. मात्र, महाराष्ट्रात जी गद्दारी झाली त्यामध्ये हेच महाशय पुढे होते. त्यांनी मंत्रिपदाचा वापर गद्दारांना पळून जाण्यासाठी केला. जिथे जिथे भाजप आणि मिंध्यांचे उमेदवार असतील, ते तण उखडून गुजरात, गुवाहाटीला तडीपार करा, फेकून द्या, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मल्हारपेठ येथील सभेत केले.