पालकमंत्री शंभूराज देसाई यांची महायुतीकडून उमेदवारी आहे. त्यामुळे कदम विरुद्ध देसाई लढतीत पाटणकरांच्या बंडखोरीने अधिक चांगली रंगत आणली आहे.
पाटण : एकतर्फी वाटणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघात (Patan Assembly Constituency) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर (Satyajit Singh Patankar) यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला आहे. त्यामुळे तेथे तिरंगी लढत होत आहे. महायुती, महाविकास अन् अपक्ष अशा लढतीत तालुक्याचे सुपुत्र माजी खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांना मानणारा गट आहे. तो काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. माजी खासदार पाटील यांच्या गटाची येथे सत्त्वपरीक्षा लागणार आहे. त्यामुळे खासदार पाटील गटाच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.