Phaltan : दोन्ही निंबाळकरांतच प्रतिष्ठेची लढाई; अजित पवार मतदारसंघावर दावा कायम ठेवणार? रामराजेंच्या रणनीतीकडे लक्ष

फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Assembly Constituency) हा २००९ पासून राखीव आहे.
Ramraje Naik-Nimbalkar vs Ranjit Singh Naik-Nimbalkar
Ramraje Naik-Nimbalkar vs Ranjit Singh Naik-Nimbalkarsakal
Updated on
Summary

विधानसभेसाठी आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी लढत पाहायला मिळणार आहे.

फलटण : फलटण विधानसभा मतदारसंघ (Phaltan Assembly Constituency) हा २००९ पासून राखीव असून, तेव्हापासून रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे समर्थक दीपक चव्हाण यांनी सलग तीन वेळा विजय मिळवून आमदार झाले. त्यांनी या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवले आहे. असे असले तरी या राखीव मतदारसंघात प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवारांपेक्षा लोकसभेपासून एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या विधान परिषदचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या दोन नाईक-निंबाळकर घराण्यातच खरी लढत होताना पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.