जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत, तेथे उमेदवारांना ताकद देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
आसू : फलटण विधानसभेच्या (Phaltan Assembly Election) प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर (Ramraje Naik- Nimbalkar) हे फलटणसह सातारा जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात का दिसत नाहीत? हा मुद्दा फलटणच्या पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उपस्थित केला. त्यावर रामराजे प्रचारात दिसत नसतील, तर त्यांना नोटीस काढतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.